Home » ठळक बातम्या » पत्रकार मिलिंद खारपाटील यांची आगरी सेना पत्रकार संघ उरण तालुका प्रमुखपदी नियुक्ती

पत्रकार मिलिंद खारपाटील यांची आगरी सेना पत्रकार संघ उरण तालुका प्रमुखपदी नियुक्ती

पत्रकार मिलिंद खारपाटील यांची आगरी सेना पत्रकार संघ उरण तालुका प्रमुखपदी नियुक्ती

उरण: आवाज महामुंबईचा चॅनलचे संपादक आणि पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रचे रायगड जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार श्री मिलिंद खारपाटील यांची आगरी सेना पत्रकार संघ उरण तालुका प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगरी सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख श्री सचिन मते यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

गेली ३६ वर्षे पत्रकारितेत सक्रिय असलेले मिलिंद खारपाटील यांनी अनेक वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनेलमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी श्रमजीवीमध्ये सहसंपादक, श्रमशक्तीमध्ये कार्यकारी संपादक आणि महामुंबई २४ बाय ७ मध्ये संपादक म्हणून काम केले आहे. याशिवाय, रामप्रहर, कर्नाळा, किल्ले रायगड, आपले साम्राज्य, आवाज कोकणचा, पुण्यनगरी, कृषीवल आणि उरण टाईम्स यांसारख्या अनेक वृत्तपत्रांमध्येही त्यांनी आपल्या लेखणीची ताकद दाखवली आहे.

सामाजिक कार्याचा मोठा वारसा

मिलिंद खारपाटील हे केवळ पत्रकार म्हणून नव्हे, तर एक सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत त्यांनी २६ वेळा रक्तदान केले असून, २०,००० पेक्षा जास्त वृक्षारोपणाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. कोकणातील पर्यटन स्थळांची माहिती वृत्तपत्रे आणि चॅनेलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळे कोकणातील पर्यटन वाढण्यास आणि स्थानिकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे.

त्यांना त्यांच्या कामासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात भारत सरकारचा जनशिक्षण सन्मान, द्रोणागिरी भूषण, पनवेलभूषण आणि कोकण रत्न यांचा समावेश आहे. न्हावा शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचा ‘पहिला एम्प्लॉयी ऑफ द इयर’ हा सन्मानही त्यांना मिळाला आहे.

ऐतिहासिक किल्ल्यांचा अभ्यासक आणि सामाजिक संस्थेतील सक्रिय सदस्य

मिलिंद खारपाटील यांनी आतापर्यंत १४३ किल्ले पाहिले आहेत, ज्यात प्रतापगडाला ४५ वेळा आणि रायगडाला १४ वेळा भेट दिली आहे. ते चिरनेर येथील ‘सेकंडरी स्कूल, दहावी १९८५’ ग्रुपचे ॲडमिन असून, या ग्रुपच्या प्रत्येक सहलीत ते छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी किल्ला पाहतात.

त्यांनी महाड आणि पोलादपूरमधील दरडग्रस्तांना मदत केली आहे, तसेच रायगड, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळा व वाचनालयांना पाच लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची पुस्तके भेट दिली आहेत. याव्यतिरिक्त, ते मानव विकास संघ उरण, महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था, अमरदीप बालविकास फाऊंडेशन, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन, सर्वोदय सामाजिक संस्था आणि चाईल्ड केअर सामाजिक संस्था यांसारख्या अनेक संस्थांशी जोडलेले आहेत.

श्री राजाराम साळवी यांनी ऑगस्ट १९८६ मध्ये स्थापन केलेल्या आगरी सेनेने समाजातील तंटे मिटवण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मोठे काम केले आहे. मिलिंद खारपाटील यांची निर्भीड पत्रकारिता आणि सामाजिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे आगरी सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख सचिन मते यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीचे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून स्वागत होत असून, अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 303 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket