Home » राज्य » शिक्षण » महालक्ष्मी ट्रस्ट केडंबे यांच्या वतीने केडंबे बाहुळे आणि वरोशी गावातील केंद्र शाळांना 100 हुन अधिक विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप

महालक्ष्मी ट्रस्ट केडंबे यांच्या वतीने केडंबे बाहुळे आणि वरोशी गावातील केंद्र शाळांना 100 हुन अधिक विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप

महालक्ष्मी ट्रस्ट केडंबे यांच्या वतीने केडंबे बाहुळे आणि वरोशी गावातील केंद्र शाळांना 100 हुन अधिक विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप

केळघर| महालक्ष्मी ट्रस्ट केडंबे यांच्या वतीने केडंबे बाहुळे आणि वरोशी गावातील केंद्र शाळांना भेट देऊन जवळ जवळ 100 हुन अधिक विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले.  

सदरच्या कार्यक्रमाला माजी आमदार सदाभाऊ सपकाळ आणि सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती होती.माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांनी ट्रस्ट चे कौतुक करून या पुढेही अशीच समाजोपयोगी कामे करत राहण्यासाठी ट्रस्टच्या सर्व कार्यक्रत्यांना आवाहन केले.

श्री. राजेंद्र मोकाशी यांनी केडंबे गावात लवकरात लवकर अशोकचक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक होण्यासाठी संपूर्ण गावाने प्रयत्न करावा आणि आपल्या तालुक्याच्या विकासात भर टाकावी असे सांगितले. जावळी तालुका विकसित होण्यासाठी आजची तरुण पिढी घडली पाहिजे आणि त्यासाठी शाळेत चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे असे ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष श्री. वैभव ओंबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

श्री. स्वप्निल धनावडे (शिवक्रांती संघटना )यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी शौर्य गथेची आठवण करून देत बोण्डरवाडी धरणाच्या विषयाला हात घालून धरणाचे फायदे ग्रामस्थाना निदर्शनास आणून दिले.

कार्यक्रमास शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, आदीनाथ ओंबळे नारायण शेठ सुर्वे, आनंदराव सपकाळ ( माजी जावली बँक संचालक ) , विजय सावले विनोद शिंगटे , एकनाथ सपकाळ ( श्री. बाजीराव सुर्वे . जगन्नाथ जाधव, विलास शिर्के, सुरेश कासुर्डे, महादेव ओंबळे ( केडंबे सरपंच ), बाजीराव धनावडे साहेब, अजिंक्य धनावडे दादा , दिपक मोरे, श्री. जगन्नाथ पार्टे , उषा उंबरकर, विद्या सुर्वे, कविता ओंबळे. वैशाली शेलार, धनश्री शेलार, लक्ष्मी उंबरकर, सुशीला पाडळे, सुधा चिकणे, संगीता ओंबळे हे प्रमुख उपास्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री. दिपक आ. ओंबळे, कार्याध्यक्ष श्री आनंदा ओंबळे, सचिव श्री. चंद्रकांत धनावडे, उपासचिव श्री. विजय ओंबळे, खजिनदर राजेंद्र जाधव, उपखजिनदार प्रमोद ओंबळे, अनिल भाऊ ओंबळे, रामजी दादा ओंबळे, संतोष दादा ओंबळे, शिवाजी ओंबळे, अमोल ओंबळे, , समाधान ओंबळे ( शिवस्वराज्य प्रतिष्ठान ),शांताराम सं.ओंबळे, पांडुरंग कि.ओंबळे, प्रथमेश भनगे, गणेश ओंबळे, सचिन ओंबळे, भानुदास ओंबळे, धनेश्वर ओंबळे, वाल्मिक ओंबळे, रवींद्र ओंबळे, शंकर ओंबळे, नवनाथ ओंबळे, अनिकेत ओंबळे, महेश ओंबळे, केवल ओंबळे, संकेत ओंबळे, प्रसाद ओंबळे, रोहन ओंबळे , विकास पवार, प्रताप लोहार इत्यादी नी विशेष प्रयन्त केले. कार्यक्रमाचे आभार श्री. विजय दादा ओंबळे यांनी केले आणि सूत्रसंचालन श्री. पांडुदादा ओंबळे यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार

Post Views: 61 प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात

Live Cricket