Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गणेशोत्सव निमित्त केडंबे पंचक्रोशीतील आबाल वृद्ध नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

गणेशोत्सव निमित्त केडंबे पंचक्रोशीतील आबाल वृद्ध नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

गणेशोत्सव निमित्त केडंबे पंचक्रोशीतील आबाल वृद्ध नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

केळघर, ता:२९:जनसेवा विकास प्रतिष्ठान केडंबे यांच्यावतीने गणेशोत्सव निमित्त केडंबे पंचक्रोशीतील आबाल वृद्ध नागरिकांसाठी, आरोग्य विभाग पंचायत समिती जावळी तसेच सेवा सदन हॉस्पिटल मिरज यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते .

आरोग्य शिबिराचे उद्घाटन जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप यादव यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. पाटील व व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यादव यांनी जनसेवा विकास प्रतिष्ठानचे उपक्रम हे आदर्शवत व लोकांचे हिताचे असतात. सामाजिक बांधीलकीतून जनसेवा प्रतिष्ठान सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. जनसेवा प्रतिष्ठानच्या विधायक उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली . याप्रसंगी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोळे, श्रमजीवी संस्थेचे संस्थापक आदिनाथ ओंबळे,आरोग्य सहायक सतीश मर्ढेकर, अमर शेडगे, प्रमोद भुजबळ , केडंबे गावचे सरपंच महादेव ओंबळे, ग्रामपंचायत सदस्य संगीता ओंबळे, वनिता ओंबळे, डांगरेघरचे सरपंच अमोल आंग्रे, वरोशीचे सरपंच विलास शिर्के, माजी सरपंच सुरेश कासुर्डे, बाळकृष्ण ओंबळे, बंडोपंत ओंबळे, प्रकाश ओंबळे, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष मारुती ओंबळे,चंद्रकांत ओंबळे , कोंडीबा भिलारे, गणपत ओंबळे, रामचंद्र सुतार, शंकर ओंबळे, बाबुराव ओंबळे, शांताराम ओंबळे,नथुराम जंगम, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठानचे संचालक सुनील गोळे, संतोष ओंबळे, बाजीराव जंगम,किरणओंबळे,विकासओंबळे,दत्ता ओंबळे,नवनाथ ओंबळे, शुभम लोखंडे, अमोल ओंबळे, सुशांत शेलार ,आनंदा ओंबळे, दीपक ओंबळे यांनी परिश्रम घेतले.एकनाथ ओंबळे यांनी आभार मानले .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार

Post Views: 142 प्रशासनाच्या प्रभावी नियोजनात पाचगणी नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पाचगणी- पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रशासनाच्या काटेकोर नियोजनात

Live Cricket