स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धाडसी कारवाई
९२ तोळे सोन्याचे दागिने व स्विफ्ट डिझायर कार हस्तगत
दिनांक ३०/०७/२०२५ रोजी पहाटे तळबीड पोलीस ठाणे हद्दीतील तासवडे टोलनाक्याजवळील श्रावणी हॉटेल समोर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या एस.टी. बस (MH14 KO 9156) मध्ये तीन इसमांनी प्रवेश करून कृष्णा कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला तलवारीसह मारहाण केली. त्याच्याकडील ९२ तोळे सोन्याचे दागिने व ₹३२,५००/- रोख जबरीने चोरले.या प्रकरणी गुन्हा क्र. १०७/२०२५ भा.दं.सं. ३०९(६), ३०५(क), ३(५) अन्वये गुन्हा नोंद झाला.
तपास व कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरण स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथे वर्ग करण्यात आले.पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपासाची जबाबदारी पो.उ.नि. परितोष दातीर यांच्याकडे सोपवली.तपास पथकाने आरोपींचा शोध घेऊन खालील आरोपींना ताब्यात घेतले :
1. राहुल दिनेश शिंगाडे, रा. शिंगणापूर ता. माण जि. सातारा
2. महावीर हणमंत कोळपे, रा. बिबी ता. फलटण जि. सातारा
3. अतुल महादेव काळे, रा. भांब ता. माळशिरस जि. सोलापूर
4. अभिजीत मनोहर करे, रा. रावडी ता. फलटण जि. सातारा
5. २ इतर फरारी आरोपी
तपासातील विशेष बाबी
आरोपींपैकी महावीर कोळपे हा पूर्वी कृष्णा कुरिअर कंपनीत नोकरीस होता. त्याला कुरिअर कर्मचारी दागिने घेऊन प्रवास करतो हे माहित असल्याने टोळीने गुन्ह्याची योजना आखली.
आरोपींनी कोल्हापूर बसस्थानकापासून एस.टी. बसचा पाठलाग करून श्रावणी हॉटेलसमोर गुन्हा केला.तपास पथकाने भालधोंडीच्या जंगलात ड्रोनच्या सहाय्याने ७ दिवस शोधमोहीम राबवून आरोपी अतुल काळे व अभिजीत करे यांना पकडले.आरोपींकडून ७१,९४,२५०/- रुपये किमतीचे ९२ तोळे सोन्याचे दागिने व स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ₹७६,९४,२५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कामगिरी केली.या पथकात पो.नि. अरुण देवकर, स.पो.नि. रोहित फार्णे, पो.उ.नि. परितोष दातीर, तसेच पोलीस अंमलदार हसन तडवी, मनोज जाधव, प्रविण कांबळे, प्रविण पवार आदींचा सहभाग होता.उत्तम तपास व धाडसी कारवाईबद्दल सर्व अधिकारी व अंमलदारांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.





