Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » यशोदा टेक्निकल कॅंपस मध्ये बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू : सुविधा केंद्र उपलब्ध

यशोदा टेक्निकल कॅंपस मध्ये बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू : सुविधा केंद्र उपलब्ध

यशोदा टेक्निकल कॅंपस मध्ये बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू : सुविधा केंद्र उपलब्ध

केंद्रीभूत प्रवेशाची पहिली फेरी २९ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणार

सातारा – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बीबीए व बीसीए या दोन अत्यंत मागणी असलेल्या अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या पहिल्या फेरीस सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांसाठी पर्याय नोंदणी प्रक्रिया २९ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून बीबीए व बीसीए प्रवेशासाठी दोन वेळा प्रवेश परीक्षा (सीईटी) आयोजित करण्यात आली होती. पहिल्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याने दुसऱ्यांदा प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व पालकांना दिलासा मिळाला असून, आता केंद्रीभूत प्रवेश फेरीतून विद्यार्थ्यांना पर्याय भरून प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचणार असून, सर्व इच्छुकांना समान संधी मिळणार आहे.

साताऱ्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था यशोदा टेक्निकल कॅंपसतर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश मार्गदर्शन व सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन पर्याय नोंदणीची तांत्रिक मदत, आवश्यक कागदपत्रांची यादी, प्राधान्यक्रम ठरविण्याबाबत मार्गदर्शन तसेच शंका निवारण या सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना करिअर काउन्सेलिंग, अभ्यासाचे नियोजन, मॉक टेस्ट, प्रश्नसंच व वैयक्तिक मार्गदर्शन अशा पूरक सुविधा देखील पुरवल्या जात आहेत.

या उपक्रमाचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणे नसून, त्यांच्या भविष्यातील करिअरची योग्य दिशा ठरविणे हा आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये पालकांचाही सहभाग महत्त्वाचा असल्याने त्यांनाही समज आणि मार्गदर्शन दिले जात आहे. यशोदा टेक्निकल कॅंपस हे साताऱ्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक केंद्र मानले जाते. येथे उपलब्ध असलेले बीबीए व बीसीए हे अभ्यासक्रम उद्योग, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, तसेच उद्योजकता या क्षेत्रांमध्ये करिअर घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. संस्थेकडे आधुनिक डिजिटल सुविधा, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, अनुभवी प्राध्यापकवर्ग, उद्योगमान्य अभ्यासक्रम आणि शंभर टक्के प्लेसमेंटचा भक्कम ट्रॅक रेकॉर्ड आहे. अनेक विद्यार्थ्यांनी याच संस्थेतून पदवी प्राप्त करून नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवली असून काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावले आहे.

यशोदा टेक्निकल कॅंपसचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे म्हणाले, “पहिल्या सीईटीमधील कमी प्रतिसादानंतर दुसऱ्यांदा परीक्षा घेण्याचा निर्णय योग्य ठरला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळेल आणि योग्य पात्रतेनुसार त्यांना प्रवेश मिळेल. आमच्या सहाय्यता केंद्राचा लाभ घेतल्यास विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही अडचणीशिवाय यशस्वी होऊ शकतील.”

दरम्यान, प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी यशोदा टेक्निकल कॅंपसच्या मॅनेजमेंट बिल्डिंगमधील बीबीए व बीसीए विभागाला प्रत्यक्ष भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.yes.edu.in या संकेतस्थळाला देखील भेट द्यावी.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 222 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket