कोटा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची ऑलंपियाड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम
कराड -आंतरराष्ट्रीय सायन्स ऑलंपियाड परीक्षेचा पहिला टप्पा व दुसऱ्या टप्प्याचा निकाल जाहीर झाला असून कराड मधील कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या दोन्हीही टप्प्यामध्ये अत्यंत नेत्र दीपक असे यश मिळवलेले आहे. कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या 36 विद्यार्थ्यानी ऑलंपियाड परीक्षेत यश मिळवले आहे. सायन्स ऑलंपियाड फाउंडेशन ही संस्था सायन्स व गणित या विषयांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची आवड निर्माण व्हावी म्हणून गेले पंचवीस वर्षे कार्यरत आहे यासाठी ही संस्था आठवी , नववी व दहावी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सायन्स व मॅथेमॅटिक्स या विषयांची ऑलंपियाड स्पर्धा आयोजित करते. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या परीक्षेत कराड येथील कोटा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे.
या दोन्ही टप्प्याच्या यशासाठी विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रांझ मेडल तसेच कॅश वॉचर, गिफ्ट व्हाउचर अशी भरघोस बक्षीस देण्यात आली. अनघा प्रकाश पाटील- गोल्ड मेडल तसेच झोनल एक्सलन्स सर्टिफिकेट व 2500 रु. चेक, वैष्णवी पाटील- गोल्ड मेडल 2500 रु. चेक, श्रीदेश यादव – सिल्वर मेडल 2500 रु.चेक, अवधूत कांबळे – सिल्वर मेडल व १००० रु. गिफ्ट व्हाउचर, प्राजक्ता तोरणे- ब्रांझ मेडल व 333 रु.चेक, सिद्धी चव्हाण- ब्रांझ मेडल व 333 रु.चेक , भकतेश जाधव ब्रांझ मेडल व 333 रु.चेक, श्रीयश खेडकर 500 रु. गिफ्ट व्हाउचर, आदित्य पाटील 500 रु. गिफ्ट व्हाउचर, स्वाधीन पात्रा 500 रु. गिफ्ट व्हाउचर ,आर्या कदम 500 रु. गिफ्ट व्हाउचर, वैष्णवी जाधव, तनिषा देशमुख, पार्थ जाधव, मिताली चव्हाण, यश अळकुंटे, धैर्य पाटील ,ओम थोरात, आर्यन डाके, कार्तिक पोळ, शुभम इंगवले, अथर्व लावंड, प्रज्वल पाटील, प्रज्योत पाटील, स्वरूप गवळी, आदित्य जगताप, ऋतुराज देवकर ,ओम डोंब ,आशुतोष थोरात, शिवम डीसले, वेदिका चौरे, नईफ इनामदार, निरव शिंदे, तन्मय काटवटे, आदित्य पाटील या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट अशी बक्षिसे देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कोटा अकॅडमीचे संचालक डॉ महेश खुस्पे, संचालिका सौ. मंजिरी खुस्पे संचालिका मैथिली खुस्पे एनडीआरएफ टीम चे कमांडिंग ऑफिसर हवालदार मेजर मयूर नरवणे व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्या सौ. जयश्री पवार, उपप्राचार्या सना संदे तसेच विद्यार्थ्यांना ऑलंपियाड संदर्भात मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, लायन्स क्लब ऑफ कराड सिटी चे अध्यक्ष ला. शशिकांत पाटील, लायन्स क्लब ऑफ कराड चे अध्यक्ष ला. सतीश मोरे, विद्या मोरे, मीनाक्षी डाके , संदीप कोलते , अभय चव्हाण ,सचिन पाटील , सुधीर पाटील , दत्तात्रय पोळ , सूर्यकांत जाधव , प्रवीण जाधव, प्रवीण जगताप , अभयसिंह जाधव , सोनल पाटील ,रूपाली थोरात , शीतल चावरे ,प्रशांत पाटील ,करुणा पात्रा ,विजय शिंदे , तन्मय काटवटे इत्यादी पालक उपस्थित होते.
