Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » यशोदा इन्स्टिट्यूटच्या बी फार्मसी अभ्यासक्रमाला एन. बी. ए. चे मानांकन प्राप्त

यशोदा इन्स्टिट्यूटच्या बी फार्मसी अभ्यासक्रमाला एन. बी. ए. चे मानांकन प्राप्त

यशोदा इन्स्टिट्यूटच्या बी फार्मसी अभ्यासक्रमाला एन. बी. ए. चे मानांकन प्राप्त

दर्जात्मक आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण पद्धतीचे सातत्य पुन्हा एकदा सिद्ध: प्रा.अजिंक्य सगरे

महाराष्ट्रातील सर्वाधिक अभ्यासक्रमांना एन. बी. ए. चे मानांकन मिळणारे एकमेव महाविद्यालय

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील बी फार्मसी या अभ्यासक्रमाला नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन, नवी दिल्ली यांच्या समितीने भेट दिली होती. तीन दिवस प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सदरच्या अभ्यासक्रमाला आगामी तीन शैक्षणिक वर्षांकरिता एन बी ए ची मान्यता प्रदान करण्यात आली. अशाप्रकारे यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील आता तब्बल आठ अभ्यासक्रमांना सदरचे मानांकन प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक अभ्यासक्रमांना एनबीए मानांकन प्राप्त करणाऱ्या मोजक्या शैक्षणिक संस्थांपैकी यशोदा टेक्निकल कॅम्पस हे एक बनले आहे. या यशाबद्दल यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, कार्यकारी संचालिका सौ नम्रता सगरे यांनी विशेष कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

एनबीएची मान्यता ही शैक्षणिक गुणवत्तेची आणि सुधारण्याची हमी देणारी प्रक्रिया आहे. मान्यताप्राप्त संस्थेतील शैक्षणिक अभ्यासक्रमांचे अत्यंत गंभीरपणे मूल्यांकन करणारी एनबीए ही प्रणाली राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनाचे महत्त्व विशद करते. मान्यतेचे निकष, प्रक्रिया, धोरणे आणि कार्यपद्धती ही नियमावलीनुसार आहे का तसेच परिणाम आधारित शिक्षण या गोष्टी प्रामुख्याने तपासणारी व्यवस्था म्हणजेच एनबीए मानांकन.

प्रथम प्रयत्नात एनबीए मान्यता मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या शैक्षणिक संस्थांपैकी यशोदा टेक्निकल कॅम्पस हे एक बनले आहे. यामुळे यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. यशोदा टेक्निकल कॅम्पस सारख्या अत्यंत सुसज्ज आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये पॉलिटेक्निक, इंजीनियरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए, बीबीए बीसीए इत्यादी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये तब्बल 25 विविध अभ्यासक्रम अशा प्रकारच्या मानांकनासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत. तसेच विद्यापीठाची कायम संलग्नता प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्र भरातील अत्यंत मोजक्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. विद्यार्थ्यांना यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये देत असलेल्या विविध सोयी सुविधा लक्षात घेऊन नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन ने या अभ्यासक्रमांना हे मानांकन बहाल केले आहे. यशोदा इन्स्टिट्यूटच्या सर्व विद्यालयांच्या गुणवत्तेचा स्तर आणि दर्जा यावरती एनबीएच्या मानांकनामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

यशोदा चे माजी विद्यार्थी हे देश विदेशात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत येथील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या खूप संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करण्यामध्ये महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे. पालकांच्या याच विश्वासाला सार्थ ठरण्याची किमया यशोदा इन्स्टिट्यूटने साकारली आहे.

यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील तज्ञ आणि अनुभवी अध्यापक वर्ग, सुसज्ज आणि अद्ययावत प्रयोगशाळा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संदर्भ ग्रंथांनी परिपूर्ण असे ग्रंथालय, अत्यंत अध्यायावत असणारे संगणक कक्ष, सर्व सुविधांनी युक्त डिजिटल क्लास रूम्स, इंक्युबॅशन सेल, उद्योजकता विकास केंद्र, या आणि अशा विविध सोयी सुविधांमुळे या प्रकारचे यश मिळवणे शक्य झाले असल्याचे मत उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांनी यावेळी व्यक्त केले. कुलसचिव गणेश सुरवसे, विभाग प्रमुख डॉ. अविनाश भागवत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या भेटीदरम्यान मोलाची कामगिरी बजावली.

यशोदा टेक्निकल कॅम्पस च्या बी फार्मसी ला मिळालेले एनबीए मानांकन हे दर्जात्मक शिक्षणाची राष्ट्रीय पातळीवरील मान्यता आहे. आमचे ध्येय नेहमीच विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व कौशल्य विकासाची संधी देणे हेच राहिले आहे. या यशामागे तज्ञ प्राध्यापक, कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांचा सामूहिक प्रयत्न आहे. एनबीए मानांकनामुळे आमच्या शिक्षण पद्धतीची गुणवत्ता अधिक अधोरेखित झाली आहे. भविष्यात आणखी अभ्यासक्रमांना हे मानांकन मिळवून विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्याचा आमचा संकल्प आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 254 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket