Post Views: 72
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. सातारा वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी होणार
सातारा -सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी १ वाजता मोरया लॉन्स मंगल कार्यालय दत्तनगर, तेजस पेट्रोल पंपा शेजारी सातारा- रहिमतपूर रोड कोडोली, सातारा येथे बँकेच्या चेअरमन मा. सौ. पुष्पलता बोबडे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेस बँकेच्या सर्व सभासदांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बँकेच्या चेअरमन सौ. पुष्पलता बोबडे , व्हॉईस चेअरमन श्री. संजीवन जगदाळे व सर्व संचालक सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आण्णासाहेब भोसले यांचेवतीने करण्यात येत आहे.
