राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गौरीशंकर च्या सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग कामगिरी.
मुलींमध्ये स्वरा सावंत तर मुलांमध्ये उत्कर्ष केंजळे ठरले सुवर्णपदकाचे मानकरी. स्पर्धेत 800 खेळाडूंचा सहभाग. स्कूलच्या क्रीडा परंपरेचा नावलौकिक विद्यार्थ्यांनी उंचविला. लिंब….. महाराष्ट्र बुडोकॅन कराटे अँड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने भुईंज येथे घेण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत विविध गटात गौरीशंकर च्या डॉ .पी. व्ही सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूल लिंबच्या विद्यार्थ्यांनी कराटे स्पर्धेत उत्तुंग यश मिळून स्कूलचा नांवलौकिक उंचविला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास 800 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये गौरीशंकर च्या डॉ पी व्ही. सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून विविध गटात बक्षीसे प्राप्त केली आहेत. यामध्ये मुलींच्या गटात स्वरा सावंत हिने काता म्हणजेच फाईट या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर आराध्या जाधव हिने रौपदक मिळवले. मुलांमध्ये यश भोसले यांनी काता या क्रीडा प्रकारात कास्यपदक तर शौर्य शिंदे यांनी रौप्यपदक तसेच उत्कर्ष केंजळे यांने काता क्रीडा प्रकारात कास्यपदक तर फाईट क्रीडा प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. रंजीत पवार यांनी काता क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर फाईट क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवले. कराटे स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण अमित मडके नितीन शिवथरे राकेश खोपडे आदी प्रमुख उपस्थित होते. प्रशिक्षक ब्लॅक बेल्ट विजेते संतोष माने यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप उपाध्यक्ष मिलिंद जगताप संचालक डॉ अनिरुद्ध जगताप जयवंतराव साळुंखे अप्पा राजगे यांनी अभिनंदन केले.
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतील विजेत्यांचा सार्थ अभिमान वाटतो.. मदनराव जगताप.शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांची शारीरिक तंदुरुस्ती तितकेच महत्त्वाचे असून यासाठी विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राशी नाते जोडणे महत्त्वाचे ठरते यासाठी गौरीशंकर च्या डॉ पी व्ही सुखात्मे स्कूल मधील शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांकडून क्रीडा क्षेत्राचा सराव घेऊन परिश्रम घेत असतात. विद्यार्थ्यांना लाभत असलेल्या अचूक मार्गदर्शन मुळे विद्यार्थी विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत असतात याचा आम्हाला नेहमीच सार्थ अभिमान वाटतो असे मत गौरीशंकर चे अध्यक्ष मदनराव जगताप यांनी व्यक्त केले आहे.
