Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » भारत-जपान सहकार्यातून यशोदा टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी जागतिक संधींचे नवे दालन

भारत-जपान सहकार्यातून यशोदा टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी जागतिक संधींचे नवे दालन

भारत-जपान सहकार्यातून यशोदा टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी जागतिक संधींचे नवे दालन

जागतिक शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधींचा नवा अध्याय

विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानासोबतच भाषिक प्रभुत्वावर विशेष भर देणाऱ्या यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, सातारा संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथे ‘एशिया टू जपान’ आणि एटूजे हिरामेकी इंडिया प्रा. लि.. या प्रतिष्ठित संस्थांच्या मान्यवर पाहुण्यांचा विशेष दौरा आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधींचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. दशरथ सगरे (संस्थापक अध्यक्ष, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ) होते, तर प्रा. अजिंक्य सगरे (उपाध्यक्ष) यांनी चर्चेत प्रत्यक्ष सहभाग सहभाग घेतला. जपानहून मासातो सांपेई (मुख्य कार्यकारी अधिकारी, एशिया टू जपान) आणि योशिहिसा तानी (संचालक, एशिया टू जपान), 

सौ. श्रुती चन्नागिरी (मुख्य कार्यकारी अधिकारी, एटूजे हिरामेकी) आणि सौ. बकुल वैद्य (जपानी भाषा प्रशिक्षक, एटूजे हिरामेकी) हे विशेष मान्यवर म्हणून तसेच प्राचार्य डॉ. विक्रम पाटील, सहसंचालक प्रा. रणधीर सिंह मोहिते उपस्थित होते. 

बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे सविस्तरपणे चर्चिले गेले. विद्यार्थ्यांना जपानमधील नामांकित शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. जपानी भाषा तज्ञ प्रशिक्षकांकडून शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यामुळे जपानी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आवश्यक असलेले भाषिक कौशल्य विकसित होईल. दोन्ही देशांच्या परंपरा, कार्यसंस्कृती आणि सामाजिक मूल्यांचा परस्पर परिचय होईल. जपानी उद्योगांमध्ये थेट भरती प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी दिल्या जाणार आहेत.

सौ. श्रुती चन्नागिरी यांनी जपानी भाषेचे शिक्षण व उपलब्ध संधी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या सर्व विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारले आणि जपानी पाहुण्यांशी संवाद साधला. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचे कौतुक केले आणि त्यांच्या करिअर घडवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले.

यशोदा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य, विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. दशरथ सगरे यांनी सांगितले की, “यशोदा टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे आणि या सहकार्यामुळे आमचे विद्यार्थी जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवतील.”

या विशेष भेटीमुळे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि करिअरच्या आंतरराष्ट्रीय दारांचा उघडण्याचा मार्ग तयार झाला आहे. यशोदा टेक्निकल कॅम्पसने ‘स्थानिक ते जागतिक’ या ध्येयाचा प्रत्यक्ष पुरावा सादर केला आहे. 

 जपानी कंपनीसोबतचे हे सहकार्य आमच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ शिक्षणापुरते मर्यादित नाही, तर ते आंतरराष्ट्रीय अनुभव, भाषिक कौशल्य, सांस्कृतिक समृद्धी आणि जागतिक करिअरच्या संधींचे दार उघडते. यशोदा टेक्निकल कॅम्पस विद्यार्थ्यांना ‘स्थानिक ते जागतिक’ या प्रवासात सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहे.” — प्रा. अजिंक्य सगरे, उपाध्यक्ष, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे

Post Views: 227 बोपर्डी ग्रामपंचायत ता.वाई चा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सहभाग-शंकर गाढवे वाई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध

Live Cricket