Post Views: 346
हिंदवी स्कूलचे पॅरालिंपिकमध्ये दोन सुवर्ण पदके
सातारा- पुणे येथे नुकत्याच झालेल्या ‘खेळोत्सव पॅरा एडिशन-२०२५’मध्ये हिंदवी पब्लिक स्कूलला दोन सुवर्ण पदके मिळाली.
हिंदवी स्कूलमधील इयत्ता सातवीमधील समीर कांबळे या विद्यार्थ्याने पॅरालिंपिक ज्युनिअर गटातील क्रीडा स्पर्धांत सहभाग घेतला होता. १०० मीटर धावणे व गोळाफेक या दोन्ही स्पर्धेत दोन सुवर्णपदक जिंकले आहेत. याबद्दल त्याचे श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका ज्योती काटकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, गुरुकुलचे समन्वयक शुभम गायकवाड, गुरुकुलचे प्रमुख संदीप जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
