Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » देवत्व बेकर्सच्या मावा केकची फलटणमध्ये दमदार एंट्री

देवत्व बेकर्सच्या मावा केकची फलटणमध्ये दमदार एंट्री

फलटणकर म्हणताहेत… व्वा! लई भारी

देवत्व बेकर्सच्या मावा केकची फलटणमध्ये दमदार एंट्री

फलटण-लाखोंच्या जीभेवर चवीचे अधिराज्य गाजवणाऱ्या साताऱ्यातील सुप्रसिध्द देवत्व बेकर्सच्या मावा केकच्या स्वादाने फलटणकर भारीच खुश झाले. फलटण येथील भक्ती एंटरप्रायजेसमध्ये स्वातंत्र्यदिनी मावा केकसह इतर केकच्या विक्रीचा प्रारंभ झाला. देवत्व बेकर्सचा मावा केक फलटणमध्ये आल्याने रोजच ‘स्वादोत्सव’ होत आहे. मावा केक खाताच क्षणी ‘व्वा, लई भारी, लाजवाब, अप्रतिम, सुपर्ब…’ असे उद्गार फलटणकरांच्या तोंडातून बाहेर पडत आहेत. 

साताऱ्यातील शाहूनगर येथील देवत्व बेकर्सने सवार्ेत्कृष्ठ चवीचा मावा केक उत्पादीत करत खवैय्यांच्या जीवेवर राज्य केले आहे. मावा केक खायचा म्हंटलं तर पहिले आणि विश्वसनीय नाव म्हणून देवत्व बेकर्सचेच नाव घेतले जाते. देवत्व बेकर्सचा स्पेशल मावा केकने लाखो खवैय्यांना भुरळ घातली आहे. वाढदिवस असो… लग्नाचा वाढदिवस असो… कोणताही आनंदाचा उत्सव, क्षण असो… अतिथी देवा भव असो… त्यावेळी सातारकर पहिली पसंती देवत्व बेकर्सच्या मावा केकला देत असतात. 

देवत्व बेकर्सचा शुध्द शाकाहारी मावा केक ड्रायफ्रूटने समृध्द आहे. संपूर्ण साताऱ्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आदी तसेच बंगळूरु, अहमदाबाद, सुरत, दिल्ली येथील अनेक खवैय्यांना या मावा केकची भुरळ आहे. याशिवाय, दुबई, कॅनडा, जर्मनी या देशातील काही भारतीयांनीही मावा केकचा स्वाद घेत आनंद व्यक्त केला आहे. 

सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उच्चभ्रू लोक, सेलिब्रिटी, शासकीय अधिकारी यांच्यासह नामांकित व्यावसायिक, उद्योजकांनीही मावा केकच्या चवीचा आनंद लुटला आहे. एकदा केक खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा हाच मावा केक खाल्ला जातो, यावरुनचा चवीचा अंदाज येतो. 

स्वातंत्र्य दिनी प्रारंभ

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून फलटण येथील भक्ती एंटरप्रायजेस येथे देवत्व बेकर्सच्या मावा केक, व्हॅनिला बटर केक, चॉकलेट केकच्या विक्रीचा प्रारंभ झाला. राममंदिराशेजारील कसबा पेठमधील बुरुड गल्ली येथील अश्विनी लेडीज शॉपी, पेंढारकर इलेक्ट्रानिक्स शेजारी हे शॉप फलटणकरांच्या सेवेत रुजू झाले आहे. 

नमकीनचेही ‘राज’

साताऱ्यातील सुप्रसिध्द राजपुरोहित यांची नमकीन उत्पादनेही प्रथमच फलटणमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. फरसाण, बाकरवडी, लसूण बाकरवडी, पोहा चिवडा, मका चिवडा, लसूण शेव, मेथी वडी, शेव आदी नमकीन पदार्थांचा आस्वाद मिळू लागल्याने फलटणकर खुश होत आहेत. 

‘स्वादोत्सव’चे रेकॉर्ड ब्रेक

मावा केक विक्रीच्या ‘स्वादोत्सवा’चे फलटणकरांनी रेकॉर्ड केले. पहिल्याच दिवशी तब्बल ३०० हून अधिक मावा केक खरेदी करत फलटणकरांनी उच्चांकी प्रतिसाद दिला. यापुढे भक्ती एंटरप्रायजेसच्या माध्यमातून देवत्व बेकर्स, राजपुरोहित हे फलटणकरांच्या सदैव सेवेत राहतील, अशी ग्वाही भक्ती एंटरप्रायजेसचे प्रो. प्रा. पत्रकार यशवंत खलाटे- पाटील यांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 10 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket