Home » राज्य » पर्यटन » गरवारे वाई हाफ मॅरेथॉनच्या सहाव्या पर्वाची मांढरदेव पठारावर श्री संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ६० झाडे लावून यशस्वी सुरवात

गरवारे वाई हाफ मॅरेथॉनच्या सहाव्या पर्वाची मांढरदेव पठारावर श्री संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ६० झाडे लावून यशस्वी सुरवात

गरवारे वाई हाफ मॅरेथॉनच्या सहाव्या पर्वाची मांढरदेव पठारावर श्री संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ६० झाडे लावून यशस्वी सुरवात

टीम वाई फाउंडेशन कडून ‘रन फॉर नेचर – एक धाव निसर्गासाठी’ या शीर्षकासह या वर्षीची मॅरेथॉन आयोजित केली जात आहे.

वाई: निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी ‘गरवारे वाई हाफ मॅरेथॉन २०२५’ यंदा ‘रन फॉर नेचर’ या अनोख्या संकल्पनेसह धावक मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावकासाठी एक वृक्ष लावण्याचा निर्धार टीम वाईने केला आहे. या मोहिमेची सुरुवात रविवार, दिनांक १७ ऑगस्ट, २०२५ रोजी ज्या मैदानाने महाराष्ट्राला नावाजलेले ॲथलीट दिले अशा मांढरदेव ॲथलेटिक फाउंडेशनच्या मैदानाभोवती मांढरदेव पठारावर वृक्षारोपण करून करण्यात आले.

यावेळी टीम वाईच्या सदस्यांनी मैदानाभोवती विविध प्रकारची झाडे लावली. मांढरदेव ॲथलेटिक फाउंडेशनचे (MAF) ॲथलेटिक कोच, वाई मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर राजगुरु कोचळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

         या उपक्रमामुळे मॅरेथॉन केवळ स्पर्धेपुरती मर्यादित न राहता ती एक सामाजिक चळवळ बनली आहे. टीम वाईने सर्व धावकांना मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जितके जास्त धावपटू सहभागी होतील, तितके जास्त वृक्ष लागतील. असा निर्धार श्री संतोष शामराव शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

‘रन फॉर नेचर – एक धाव निसर्गासाठी’ या संकल्पनेमुळे वाई मॅरेथॉनला एक वेगळा सामाजिक उद्देश मिळाला आहे, ज्यामुळे धावपट्टूंच्या माध्यमातून निसर्गासाठी काहीतरी करण्याची संधी मिळत आहे. नोंदणी करून दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या वाई मॅरेथॉनमध्ये आपला सहभाग नोंदवून निसर्ग संवर्धनासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन यावेळी वाई मॅरेथॉनचे आयोजक टीम वाई स्पोर्ट्स फाउंडेशन यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 23 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket