८५वा औंध संगीत महोत्सव २०२५ — संगीत रसिकांसाठी आनंदसोहळा
औंध (ता. खटाव) : शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य औंध संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा हा महोत्सव विशेष ठरणार असून, प्रतिष्ठान आपल्या गौरवशाली परंपरेचे ८५वे वर्ष साजरे करत असल्याची माहिती संयोजकानीं सातारा येते झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हा संगीत महोत्सव औंध कला मंदिर, औंध (जि. सातारा) येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. महोत्सवाचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८:४५ वा. संपन्न होणार आहे. उद्घाटनाचे मानाचे कार्य श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब, औंध यांच्या हस्ते होणार असून, प्रशासक व ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत औंध यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.यावेळी ना. अजितदादा पवार यांनी उपक्रमास भरीव मदत केल्याचे संयोजकानी सांगितले.संगीत शिक्षण घेतलेल्या विध्यार्थीना ही पर्वनी ठरणार आहे.
संध्याकाळी ४.०० वाजता ‘रियाझ २०२५’ या स्मरणिकेचे प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. ना. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन असतील. तसेच महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. श्रावण हर्डीकर, सातारा जिल्हाधिकारी मा. श्री. संतोष पाटील, प्रशासक श्री. आय. ए. शेख व ग्रामविकास अधिकारी श्री. सी. एन. काझी या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या महोत्सवात देशभरातील नामवंत गायक, वादक आणि संगीतप्रेमी सहभागी होणार असून, औंध नगरी पुन्हा एकदा संगीताच्या स्वरांनी निनादणार आहे.
सर्व संगीत रसिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे व या ऐतिहासिक संगीत परंपरेचा भाग होण्याचे शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान तर्फे हार्दिक आवाहन करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मंडळ व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
