Home » Uncategorized » क्राईम डायरी » 29 व्या मजल्यावरून आईनं मुलीला फेकलं अन् क्षणात सगळं संपलं, नवी मुंबई हादरली!

29 व्या मजल्यावरून आईनं मुलीला फेकलं अन् क्षणात सगळं संपलं, नवी मुंबई हादरली!

29 व्या मजल्यावरून आईनं मुलीला फेकलं अन् क्षणात सगळं संपलं, नवी मुंबई हादरली!

नवी मुंबई: नवी मुंबईच्या पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेनं आपल्या पोटच्या मुलीला चक्क 29 व्या मजल्यावरून खाली फेकलं आहे. मुलीला खाली फेकल्यानंतर महिलेनं स्वत: देखील इमारतीवरून उडी मारून आयुष्याचा शेवट केला आहे.

एकाच दिवशी अशाप्रकारे मायलेकीचा मृत्यू झाल्याने सोसायटीत खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? २९ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये नक्की काय घडलं? याचा तपास पोलीस करत आहेत. मायलेकीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जातेय.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पनवेल येथील पळस्पे परिसरातील मॅरेथॉन नेक्सन ओरा बिल्डिंगमध्ये घडली आहे. या इमारतीत ४१ वर्षीय आशिष दुवा आपली पत्नी मैथिली दुवा आणि आठ वर्षीय मुलगी मायरा यांच्यासमवेत वास्तव्याला आहेत. ते इमारतीच्या २९ व्या मजल्यावर राहतात. घटनेच्या दिवशी मैथिली यांनी मानसिक अवस्था ठीक नसल्याने आपल्या आठ वर्षांच्या मुलीला बेडरूमच्या खिडकीतून खाली फेकलं.

मुलीला 29 व्या माळ्यावरून खाली फेकून तिचा खून केल्यानंतर मैथिली यांनी देखील 29 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. एकाच दिवशी अशाप्रकारे मायलेकीचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Post Views: 16 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ, स्थानिक स्वराज्य

Live Cricket