Home » खेळा » विज्ञानाचा शोध ते बोध समजून घेताना आली धमाल २५० विद्यार्थ्यांनी घेतले विज्ञानाचे धडे

विज्ञानाचा शोध ते बोध समजून घेताना आली धमाल २५० विद्यार्थ्यांनी घेतले विज्ञानाचे धडे 

विज्ञानाचा शोध ते बोध समजून घेताना आली धमाल २५० विद्यार्थ्यांनी घेतले विज्ञानाचे धडे 

सातारा / प्रतिनिधी पाण्यातला भोवरा, रंगांच्या सावल्या, आरश्यांच्या विविध छटा,चक्रीवादळची निर्मिती,यंत्र मानवाच्या हालचाली, चुंबकाचा वापर केलेली मनोरंजक खेळणी, कुजबुजणाऱ्या तबकड्या,तंत्रज्ञानाने भांड्यातील पाणी गायब करणे, हवेत तरंगणारे चेंडू, आळशी नाणी,अंत नसणारी विहीर अशा वैज्ञानिक दृष्टिकोन बदलणारे मनोरंजनातून विज्ञानाची धमाल विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली.

प्रत्येक घटनेचा कार्यकारण भाव तब्बल एकाच वेळी २५० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विज्ञानाचा शोध ते बोध समजून घेत राष्ट्रीय विज्ञान साजरा केला.

रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये येथील रयत सायन्स ॲण्ड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञानाचा शोध ते बोध हा एक दिवसीय उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमात तब्बल २५० विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता वाढवली.

यावेळी सेंटरचे संचालक डॉ. सारंग भोला यांनी,सोप्या पद्धतीने विज्ञान आणि त्याच्या विविध छटा समजून देत विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले. शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यानी जगभरात आजपर्यंत विज्ञानाने केलेली प्रगती आणि त्यामागील सत्यता समजून घेण्यासाठी या सायन्स सेंटरला भेट द्यावी, असे आवाहन केले.

ज्येष्ठ आणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी उद् घाटन केलेल्या यासेंटर मध्ये गेल्या ४ वर्षात १६,००० विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रत्येक घटनेचा वैज्ञानिक कार्यकरणी भाव समजून घेतला आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिनी कार्यक्रमात सेंटरचे सचिन सोनुले आणि विशाल मोरे यांनी वेगवेगळे प्रयोग करत मनोरंजनातून विज्ञानाची ओळख करून दिली.त्याच दरम्यान विज्ञान प्रश्नमंजूषा, चित्रकला, रांगोळी अशा स्पर्धा घेऊन विजेत्यांचे बक्षिस देऊन सन्मानित करण्यातआले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते २७ एप्रिल दरम्यान चालेल

Post Views: 78 नॅशनल हेराल्ड केस – काँग्रेस ५७ शहरांत ५७ पत्रकार परिषदा घेणार:’काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे’ मोहीम २१ ते

Live Cricket