Home » राज्य » म्हसवे गटात मानकुमरेंची ताकद फुल्ली“दिल से वसंतराव मानकुमरे फिरसे”च्या घोषणांनी मेढा हादरला

म्हसवे गटात मानकुमरेंची ताकद फुल्ली“दिल से वसंतराव मानकुमरे फिरसे”च्या घोषणांनी मेढा हादरला

म्हसवे गटात मानकुमरेंची ताकद फुल्ली“दिल से वसंतराव मानकुमरे फिरसे”च्या घोषणांनी मेढा हादरला

मेढा : जावली ताल्क्यातील म्हसवे गटात पुन्हा एकदा मानकुमरेंचा वणवा पेटला.

“दिल से वसंतराव मानकुमरे फिरसे” या आक्रमक घोषणांनी मेढा शहर अक्षरशः दणाणून सोडत, जावली तालुक्याची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या तुफान विराट रॅलीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या शक्ती प्रदर्शनाने म्हसवे गटातली राजकीय लढत एकतर्फी होण्याचे संकेत दिले. म्हसवे गटातून वसंतराव मानकुमरे, हातगेघर पंचायत समिती गणातून गोरख महाडीक आणि म्हसवे पंचायत समिती गणातून सौ. रेश्मा पोफळे यांनी अर्ज दाखल करताच भाजपची संघटनात्मक ताकद उघडपणे समोर आली.

गेली ३० वर्षे जावलीच्या जनतेच्या मनावर राज्य करणारे वसंतराव मानकुमरे हे केवळ नेते नाहीत, तर जनतेचा आवाज आहेत. पंचायत समितीचे सभापती ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष अशी जबाबदारी पार पाडताना त्यांनी कधीही जनतेपासून दुरावा निर्माण होऊ दिला नाही. दुर्गम डोंगराळ भागातील आरोग्य, शिक्षण आणि शेतीचे प्रश्न असोत वा विकासाची रखडलेली कामे— मानकुमरेंनी प्रत्येक लढाई रस्त्यावर उतरून जिंकली आहे.

विरोधकांच्या कोल्हेकुईला थारा न देणारे, जावलीचा ऐरावत म्हणून ओळख निर्माण करणारे मानकुमरे यांनी या विराट शक्तीप्रदर्शनातून “मीच म्हसवेचा किंगमेकर नाही, तर किंग आहे” असा स्पष्ट संदेश दिला आहे.

अर्ज भरताना उसळलेला कार्यकर्त्यांचा जोश, रॅलीतील प्रचंड गर्दी आणि घोषणांचा भडिमार पाहता,

या निवडणुकीत म्हसवे गटात मानकुमरेंसमोर उभं राहणं विरोधकांसाठी आव्हान ठरणार आहे, हे जवळपास निश्चित आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा सातारा  प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि

Live Cricket