यशोदा इन्स्टिट्यूट चे प्रा. अल्पाज शेख यांना सर्वोत्तम फॅकल्टी पुरस्कार जाहीर

यशोदा इन्स्टिट्यूट चे प्रा. अल्पाज शेख यांना सर्वोत्तम फॅकल्टी पुरस्कार जाहीर
सातारा :यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील सिविल इंजीनियरिंग विभागाचे प्राध्यापक अल्फाज शेख यांना इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन च्या महाराष्ट्र आणि गोवा विभागाकडून त्यांच्या आयएसटीई उपक्रमांमधील योगदानाबद्दल बेस्ट फॅकल्टी फोर एक्सलन्स कॉन्ट्रीब्युशन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन ही संस्था तांत्रिक शिक्षणातील अग्रगण्य संस्थांपैकी एक असून विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालय यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असते. संस्थेमार्फत दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी पार पाडणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थांचा विविध पुरस्कारांद्वारे सन्मान केला जातो. त्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा विभागाअंतर्गत या पुरस्कारासाठी प्रा. शेख यांची निवड करण्यात आली आहे. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा नोवेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये संपन्न होतो आहे.
प्रा. शेख हे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे शिक्षक असून त्यांना भारत सरकारकडून त्यांच्या संशोधन कार्यासाठी पेटंट देखील प्राप्त झाले आहे.त्यांच्या या योगदानाबद्दल आणि यशाबद्दल यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा.अजिंक्य सगरे, संचालक, सहसंचालक, कुलसचिव, प्राचार्य यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी बोलताना प्रा. दशरथ सगरे यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आणि त्यांचे करिअर घडवण्याचे आवाहनप्रा. शेख यांना केले.